बीड, दि. 4 :- वडवणी तालुक्यातील
संजय गांधी, श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेखालील राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमाअंतर्गत
लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे आधारकार्ड बँकेशी संलग्न करण्यासाठी तात्काळ
तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करावेत. आधार क्रमांक सिडिंगचा कार्यक्रम
हा शासनाच्या सुचनेनूसार राबविण्यात येत असल्यामुळे भविष्यात आधार कार्ड न दिल्यामुळे
कोणत्याही लाभार्थीचे मासीक अनुदान, अर्थसहाय्य पुर्व सुचना न देता बंद झाल्यास लाभार्थी
स्वत: जबाबदार राहतील. असे तहसिलदार, वडवणी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा