बीड, दि. 4 :- बांगरवाडी
येथे गाव तलाव फुटल्याने झालेल्या नुकसानीचे जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत नूकसानीची
भरपाई शेतकरी-ग्रामस्थांना तातडीने उपलब्ध करुन द्यावी अशा सुचना राज्याचे जलसंधारण
व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी केल्या.
पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी येथे अतिवृष्टीमुळे
गाव तलाव फुटून तलावातील पाण्याने गाव परिसरातील शेती व जमिनीच्या झालेल्या नुकसानीची
पाहणी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपविभागीय
अधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसीलदार मुकेश कांबळे, नायब तहसिलदार गणेश जाधव, मुध्याधिकारी
रुपाली कांबळे, जलसंधारण विभागाचे उपअभियंता श्री.घोळवे, श्री.निंबाळकर, जलसंपदा विभागाचे
कार्यकारी अभियंता श्री.कोटेचा, पंकज कांकरिया यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जलसंधारण मंत्री राम
शिंदे म्हणाले की, बांगरवाडी येथील तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच
जमिनही खरडून गेली आहे. या नुकसानीचे कृषी व संबंधित विभागांनी तातडीने पंचनामे करावेत
जेणेकरुन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन देणे शक्य होईल. तसेच पाण्यामुळे
वाहून आलेल्या दगड व मातीमुळे या परिसरातील बऱ्याच विहीरी बुजल्या आहेत व मोटारीही
बुडल्या आहेत. या नुकसानीचे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही जलसंधारण मंत्री
राम शिंदे यांनी दिल्या. यावेळी बांगरवाडी गावातील ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी, अधिकारी
उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा