बीड, दि. 8 :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. राधाकृष्ण
विखे पाटील हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा सुधारीत दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.10 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 9.05 वाजता लातूर येथून
स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकिय महाविद्यालय हेलिपॅड ता.अंबाजोगाई जि.बीड येथे आगमन
व मोटारीने अंजनपूर ता.अंबाजोगाईकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता अंजनपूर येथे आगमन. अंजनपूर
व कोपरा येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा.
सकाळी 10 वाजता कोपरा येथून मोटारीने अंबाजोगाईकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता स्वामी
रामानंदतिर्थ वैद्यकिय महाविद्यालय हेलिपॅड
अंबाजोगाई येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने ता.धारुरकडे प्रयाण. सकाळी 11.45
वाजता धारुर हेलिपॅड जि.बीड येथे आगमन व मोटारीने जहांगीरमोहाकडे प्रयाण. दुपारी
12 वाजता जहांगीरमोहा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त
शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 12.30 वाजता बोडका कासारी येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या
नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 12.45 वाजता बोडका कासारी येथून
मोटारीने धारुरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता धारुर हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने
पाटोदा जि.बीडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता पीव्हीपी कॉलेज हेलिपॅड पाटोदा जि.बीड येथे आगमन व मोटारीने दासखेडकडे प्रयाण.
सकाळी 1.35 वाजता दासखेड येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त
शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 1.50 वाजता दासखेड येथून मोटारीने पाली ता.बीडकडे प्रयाण.
दुपारी 2.15 वाजता पाली येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त
शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 2.30 वाजता पाली येथून मोटारीने बीडकडे प्रयाण. दुपारी 2.45
वाजता शासकीय विश्रामगृह,बीड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता पत्रकार परिषद
(स्थळ-शासकीय विश्रामगृह,बीड). सायंकाळी 4 वाजता बीड येथून खाजगी हेलिकॉप्टरने लोणी
ता.राहाता जि.अहमदनगरकडे प्रयाण करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा