बीड, दि. 8 :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय
मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्याचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.9 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 7 वाजता पंढरी निवासस्थान
परळी येथून शासकीय मोटारीने आष्टी ता.परतूर जि.जालनाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता आष्टी
येथून मौजे टोकवाडी ता.परळी वैजनाथ येथे आगमन व परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4 वाजता परळी वैजनाथ येथे आगमन व नगर परिषदेच्या
वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता परळी वैजनाथ येथून शासकीय मोटारीने
नांदेडकडे रवाना. रात्री 12 वाजता नांदेड येथून शासकीय मोटारीने परळी वैजनाथ निवासस्थानी
आगमन व राखीव.
सोमवार दि.10 ऑक्टोबर 2016 रोजी परळी वैजनाथ येथे राखीव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा