गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

भारत सरकार शिष्यवृत्तीसंदर्भात महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचाऱ्यांची कार्यशाळा


बीड, दि. 8 :- जिल्ह्यातील मागावर्गीय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक काढणे व आधार क्रमांक हा बँक खात्याशी संलग्न करणे इत्यादी बाबतच्या सुचना यापुर्वी वेळोवेळी दिल्या असून त्या अनुषंगाने गुरुवार दि.15 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य व भारत सरकार शिष्यवृत्ती कामकाज सांभाळणारे कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेस न चुकता उपस्थित राहणे आवश्यक आहे. पूर्वीच्या सुचनेप्रमाणे महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र सोबत आणावेत व ज्या महाविद्यालयांनी डिजिटल सिग्नेचर अद्यापपर्यंत तयार केलेले नाहीत अशा महाविद्यालयांचे डिजिटल सिग्नेचर तयार करण्याची कार्यवाही संबंधित एजन्सीमार्फत या कार्यशाळेत करण्यात येईल. त्यासाठी प्राचार्यांचेआधारकार्ड व पॅनकार्ड सोबत आणावेत. भारत सरकार शिष्यवृत्तीचे बँक खातेक्रमांक बाबतचे प्रमाणपत्र या बैठकीमध्ये सादर करावयाचे आहेत. जे महाविद्यालय वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने प्रतिसाद देणार नाहीत व बैठकीस उपस्थित राहणार नाहीत अशा महाविद्यालयांची शैक्षणिक वर्ष सन 2016-17 मध्ये शिष्यवृत्ती मंजूरीबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. असे समाज कल्याणचे आयुक्त आर.एम. शिंदे यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा