गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व कृषि विकास योजनेत बदल 20 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत



बीड, दि. 8 :- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये बदल झाल असून नवीन मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. चालु वर्षामध्ये योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अंतर्गत आंबा घन पध्दतीने लागवड करणे, सामुहिक शेततळे, प्लास्टीक अस्तरीकरण करणे,शेडनेट, मशागतीकरीता यांत्रिकीकरण, प्रक्रीया केंद्र इत्यादीकरीता शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.

अर्ज आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त प्राप्त झाल्यास प्राप्त अर्जाची यादी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर पाहता येईल. या यादी सोबत लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याने मंडळ कृषि अधिकारी कार्यालयामार्फत दि.20 सप्टेंबर पर्यत प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे बीडचे तालुका कृषी अधिकारी  यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा