बीड, दि.3:-
जिल्हा परिषद, बीड आणि शिक्षण विभागातर्फे बीड जिल्हा परिषदेच परंपरेनूसार शिक्षण क्षेत्रात
उल्लेखनिय कार्य केलेल्या शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यासाठी
दि.5 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे समारंभाचे आयोजन
केले आहे.
जिल्हा
परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तर प्रमुख पाहूणे
म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद उपाध्यक्षा श्रीमती आशा दौंड, पोलीस
अधिक्षक अनिल पारसकर, बांधकाम व अर्थ समितीचे सभापती संदीप क्षीरसागर, मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे, समाजकल्याण समितीचे सभापती महेंद्र गर्जे , महिला व बालकल्याण
समितीच्या सभापती श्रीमती कमल मुंडे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिक्षण व आरोग्य
समितीचे सभापती बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा