सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

अल्पसंख्यांक बहुल शाळा, महाविद्यालयांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावेत



बीड, दि. 12 :- अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना शासन निर्णय दि.7.10.2015 अन्वये कार्यान्वित करण्यात आली आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी ही योजना शासन निर्णयातील अटी व शर्तीनूसार राबविण्यात येणार आहे. इच्छुक शाळांनी विहित नमुन्यात प्रस्ताव 30 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हाधिकारी, बीड येथे सादर करावेत असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा