सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

माजी सैनिकांच्या पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत


बीड, दि. 12 :- विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांना इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत व ज्यांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य केले आहे. अशा माजी सैनिकांनी दि.20 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालय, बीड येथे अर्ज सादर करावेत.

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना सन 2015-16 या वर्षासाठी 10 हजार व 25 हजार रुपये रक्कमेसह विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये विशेष गौरव समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याकडून प्राप्त झालेल्या प्रकरणांची छाननी करुन विशेष गौरव पुरस्कार मंजूर करण्यात येईल.  सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातून (पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, कोल्हापूर, नाशिव आणि लातूर) इयत्ता 10 वी व 12 वी मंडळाच्या परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या 5 याप्रमाणे दहावीच्या एकुण 50 पाल्य व बारावीचे एकुण 50 माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा