शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

रविवारी 40 उपकेंद्रावर परीक्षा; केंद्र परिसरात 144 कलम लागू



बीड, दि. 10 :- बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल आस्थापनेच्या तलाठी, वाहनालक, लघुटंकलेखक पदाची लेखी परीक्षा रविवार दि.11 सप्टेंबर 2016 रोजी बीड शहरातील विविध 40 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या परिसरात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
परीक्षा केंद्राच्या 100मिटर परिसरात झेरॉक्सची दुकाने, इंटरनेट सुविधा व फोन बुथ बंद राहतील. तसेच परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांसोबत काळ्या शाईचे पेन, लिखानाचा पुठ्ठा, मुळ प्रवेशपत्र, स्वत:चे कोणतेही फोटो असलेले ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत इतकेच साहित्य बाळगण्यास परवानगी राहिल. या व्यतिरिक्त पुस्तके, बॅग, मोबाईल, कॅल्कुलेटर, लॉग टेबल, कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण इत्यादी साहित्य आणण्यास मनाई आहे. तसेच परिक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या आवारात कोणत्याही पालकास प्रवेश दिला जाणार नाही.

परीक्षेमध्ये गैरप्रकार व गैरव्यवहार करणाऱ्या समाजकंटक, उमेदवाराविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाई करण्यात येईल. तसेच या परीक्षेच्या प्रक्रीयेबद्दल अफवा पसरवून अथवा उमेदवारांना निवड करुन देण्याचे प्रलोभन दाखवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तरी अशा अफवा व प्रलोभनास उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी बळी पडू नये. अश प्रवृत्तीच्या लोकांकडून उमेदवारांशी संपर्क साधल्यास जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्थानिक पोलीस स्टेशन व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी व ही भरती प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडण्यास सहकार्य करावे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा