बीड, दि. 11:- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती
पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील सुधारीत कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.13 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी
8.15 वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह बीड येथे आगमन व राखीव.
सकाळी 9.45 वाजता बीड येथून शासकीय वाहनाने केजकडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता केज येथे
आगमन व समाधान शिबीराअंतर्गत विविध शासकीय योजनांचे प्रमाणपत्र, दाखले वाटपाचा कार्यक्रम
व मार्गदर्शन (स्थळ-तहसील कार्यालय, केज). दुपारी 12.45 वाजता केज येथून मौजे तडोळा
ता.अंबाजोगाईकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता तडोळा येथे आगमन व आडसूळ कुटुंबियांचे सांत्वनपर
भेट. दुपारी 1.45 वाजता शासकीय वाहनाने अंबाजोगाईकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता अंबाजोगाई
येथे आगमन व विश्व सुपर मार्केटच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.15 वाजता
शासकीय वाहनाने अंबाजोगाई येथून परळीकडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता परळी निवासस्थानी
आगमन व राखीव.
रविवार दि.14 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी
8.30 वाजता शासकीय वाहनाने परळी येथून घनाळतांडा ता.परळीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता
घनाळतांडा येथे आगमन व तांडा क्र.1 व 2 येथे मुलभूत सुविधाअंतर्गत तसेच आमदार व खासदार
फंडातील विविध विकास कामांचे उदघाटन. सकाळी 9.30 वाजता रामेवाडी ता.परळी येथे सीएनबी बंधाऱ्याचे लोकार्पण,
जलपुजन व विविध विकास कामांचे उदघाटन. सकाळी 10 वाजता पोहनेर
येथे
सांसद आदर्श ग्राम योजनेच्या कामाची पाहणी, पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे उदघाटन
व विविध विकास कामांचा शुभारंभ. सकाळी 10.30 वाजता रामनगर तांडा येथे सामाजिक सभागृह
व विविध विकास कामांचे उदघाटन. सकाळी 11 वाजता हिवरा ता.परळी सीएनबी बंधाऱ्याचे लोकार्पण
सोहळा, जलपुजन, विविध विकास कामांचे उदघाटन तसेच शासकीय धनादेशाचे वितरण. दुपारी
12.30 वाजता हिवरा येथून शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता परळी येथील
निवासस्थानी आगमन व राखीव.
सोमवार दि.15 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 7
वाजता शासकीय वाहनाने परळी निवासस्थान येथून बीडकडे प्रयाण. सकाळी 8.15 वाजता शासकीय
विश्रामगृह,बीड येथे आगमन व राखीव. सकाळी 8.55 वाजता पोलीस परेड मैदान बीडकडे प्रयाण
व आगमन. सकाळी 9.05 वाजता स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण
व विविध कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-पोलीस परेड मैदान,बीड). सकाळी 10 वाजता नवनिर्मित
सायबर लॅब व मोबाईल फॉरेन्सीक लॅब अनावरण सोहळा (स्थळ-जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय,बीड).
सकाळी 10.20 वाजता शासकीय वाहनाने बीड येथून खोकरमोहा ता.शिरुर कासारकडे प्रयाण. सकाळी
10.50 वाजता खोकरमोहा गावच्या ग्रामसभेस उपस्थिती व संबोधनपर मार्गदर्शन. सकाळी
11.40 वाजता खोकरमोहा येथून पाडळी मार्गे आर्वी ता.शिरुर कासारकडे प्रयाण. दुपारी
12.10 वाजता पाडळी ता.शिरुर येथे आगमन व जलपुजन कार्यक्रमास उपस्थिती व आर्वीकडे प्रयाण.
दुपारी 12.40 वाजता आर्वी येथे आगमन व शांतीवन
संस्थेस भेट व पाहणी. दुपारी 1.40 वाजता आर्वी येथून बीडकडे प्रयाण.दुपारी 2 वाजता
बीड रोडलगत जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी बीड-नगर रेल्वे कामाची पाहणी.
दुपारी 2.40 वाजता सुभाष नगर बीडकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता बीड जनवृत्त पहिल्या अंकाच्या
साप्ताहिक सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह,बीड येथे आगमन व
राखीव. सायंकाळी 5 वाजता बीड येथून शासकीय वाहनाने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा