बीड, दि. 11 :- साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय बीड यांना सन
2016-17 या आर्थिक वर्षाकरीता अनुदान योजनेअंतर्गत 1 हजार 58 लाभार्थी व बीज भांडवल
योजनेअंतर्गत 317 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून मातंग समाजातील होतकरु
लाभार्थ्यांनी कर्ज व अनुदान योजनेसाठी अर्ज जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे दि.25 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करावेत.
कर्ज प्रकरणासोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे
प्रमाणपत्र, शिधापत्रिका, मतदान कार्ड, आधारकार्ड, कोटेशन, जागेचा पुरावा, प्रकल्प
अहवाल, दोन फोटोसह कर्ज प्रस्ताव दोन प्रतीमध्ये गुरुवार दि.25 ऑगस्ट पर्यंत सादर करावा.
लाभार्थ्यांने यापूर्वी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. असे लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे विकास महामंडळ मर्या.बीडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा