मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

बीड जिल्ह्यासाठी तुरडाळीचे नियतन मंजूर



                बीड, दि. 9 :-  जिल्ह्यातील  11 तालुक्यासाठी माहे ऑगस्ट 2016 चे एकूण 2 हजार 912 क्विंटल तुरडाळीचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. वाहतुक पुरवठादार म्हणून इटीजी ॲग्रो प्रायव्हेट लि.मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून  इटीजी ॲग्रो प्रायव्हेट लि.मुंबई तालुक्यातील 11 शासकीय धान्य गोदामामध्ये तुरडाळ पोहोच करणार आहेत. जिल्ह्यामध्ये एएवाय कार्डसंख्या 43130 व बीपीएल कार्ड संख्या 237079 अशी एकुण 280209 एवढी कार्डसंख्या असल्याने 2912 तुरडाळ मंजूरीपैकी जिल्ह्यास आवश्यक असणारी 2802.09 क्विंटल तुरडाळ नियतन तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आहे.

            तालुकानिहाय तुरडाळ मंजूर नियतन बीड-657.56 क्विंटल, वडवणी-119.13, गेवराई-392.93, आष्टी-254.33, पाटोदा-135.36, शिरुरकासार-153.4, अंबाजोगाई-183, परळी-270.22, केज-301.75, धारुर-185.06 तर माजलगाव तालुक्यासाठी 149.35 क्विंटल असे एकूण 2802.09 क्विंटल नियतन मंजूर असुन सर्व तुरडाळ नॉमिनीनी वेळेत उचल करावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा