बीड, दि. 9 :- जिल्ह्यातील 11 तालुक्यातील साखर नॉमिनीसाठी माहे ऑगस्ट
2016 चे एकूण 6 हजार 74 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. वाहतुक पुरवठादार
म्हणून राज ट्रेडर्स चौसाळा जि.बीड यांची नियुक्ती
करण्यात आली असून राज ट्रेडर्स तालुक्यातील 11 गोदामामध्ये साखर पोहोच करणार आहेत.
तालुकानिहाय साखरेचे मंजूर नियतन बीड-1
हजार 167 क्विंटल, वडवणी-246, गेवराई-954, आष्टी-532, पाटोदा-334, शिरुरकासार-379,
अंबाजोगाई-440, परळी-613, केज-743, धारुर-366 तर माजलगाव तालुक्यासाठी 300 क्विंटल
असे एकूण 6 हजार 74 क्विंटल नियतन मंजूर असुन सर्व साखर नॉमिनीनी वेळेत उचल करावी.
असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा