मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

4 ते 10 सप्टेंबर दरम्यान नागपूर येथे सैन्य भरती मेळावा



                बीड, दि. 9 :-  सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन  4 ते 10 सप्टेंबर 2016 दरम्यान 118 इन्फट्री बटालीयन (टी.ए.) फोर्ट सीताबर्डी, नागपूर येथे करण्यात आले आहे.

            मेळाव्यात 18 ते 42 वर्ष वयोगटातील उमेदवारांनी सर्व कागदपत्रासह सकाळी 6 वाजता हजर रहावे. या भरती प्रक्रीयेत सोल्जर जनरल ड्युटी-35, सोल्जर शेफ-2 आणि सोल्जर लिपिक -2 अशा जागा असून अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बीड येथे संपर्क साधावा व इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा