बीड, दि. 11 :- विधान
परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.12 ऑगस्ट 2016 रोजी परळी वैजनाथ
शहरातील विविध विकास कामांचे उदघाटनास उपस्थिती. नंतर परळी येथे राखीव व मुक्काम.
शनिवार दि.13 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी
7.30 वाजता पंढरी निवासस्थान, परळी येथून शासकीय मोटारीने सिरसाळाकडे रवाना. सकाळी
8 वाजता काळाराम मंदिर, सिरसाळा येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीस उपस्थिती. नंतर सोयीनूसार
परळीकडे रवाना. सायंकाळी 6.30 वाजता निवासस्थान परळी येथून शासकीय मोटारीने पौळ पिंपरी
ता.परळीकडे रवाना. रात्री 7 वाजता मौजे पौळ पिंपरी येथे आगमन व कार्यकर्ता बैठकीस उपस्थिती.
नंतर सोयीनूसार परळीकडे रवाना व परळी येथे मुक्काम.
रविवार दि.14 ऑगस्ट 2016 रोजी परळी शहरातील
विविध विकास कामांच्या उदघाटनास उपस्थिती. नंतर परळी येथे राखीव व मुक्काम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा