बीड, दि. 3 :- बीड जिल्ह्यातील सर्व केंद्र शासन, राज्य शासन,
निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकृत उपक्रम, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था व
सर्व खाजगी आस्थापनांनी माहे जून 2016 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 दि.31ऑगस्ट2016
पुर्वी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे http://www.maharojgar.gov.in या
संकेतस्थळावर ऑनलाईन भरुन रिसिप्टची प्रिंट जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र जायकवाडी वसाहत, जुने विश्रामगृह,नगर रोड, बीड येथे सादर करावी.
तसेच विवरणपत्र ईआर- 1 भरुन विवरणाची प्रिंट कार्यालयास सादर
करावी. विवरणपत्र भरुन प्रिट सादर न करणाऱ्या आस्थापना विरुध्द अधिनियम 1959 नियम कलम
1960 व कलम 6 अन्वये दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असून अशा आस्थापनांविरुध्द न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल. सर्व आस्थापनांना
त्यांचे नवीन युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आले आहेत. तसेच ऑनलाईन माहिती
भरण्याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. विवरणपत्र विहीत मुदतीत पाठविण्यात यावी,
असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक
वि.जा.मुकणे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा