बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

अल्पसंख्याक बहुल शाळांनी अनुदानासाठी प्रस्ताव द्यावेत




            बीड, दि. 3 :- अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी त्यांच्या दि.3 ऑगस्ट 2016 रोजीच्या परिपत्रकान्वये अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी ही योजना 7 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार राबविण्यात येणार असल्याचे कळविले आहे तरी इच्छुक शाळेने विहीत नमुन्यात प्रस्ताव दि.8 ऑगस्ट 2016 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सादर करावे असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा