बीड, दि. 18 :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे
हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौऱ्यातील
कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार
दि.19 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय मोटारीने पुणे येथून शासकीय विश्रामगृह,
बीड येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या
बैठकीस उपस्थिती (स्थळ-निलकमल हॉटेल, तहसिल समोर, बीड). सोईनुसार बीड येथून सिरसाळा
ता.परळीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता सिरसाळा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या
बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता पोहनेर ता.परळी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस
कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थिती. सोईनूसार परळी पंढरी निवासस्थानाकडे शासकीय मोटारीने
प्रयाण.
शनिवार
दि.20 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 8 वाजता पंढरी निवासस्थान येथून शासकीय मोटारीने उदगीर
ता.लातूरकडे प्रयाण.
सोमवार
दि.22 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 8.30 वाजता पंढरी निवासस्थान परळी येथे आगमन व राखीव.
सकाळी 9 वाजता राष्ट्रसंत श्री.भगवानबाबा जयंती उत्सव 2016 मिरवणुकीचे उदघाटन (स्थळ-शिवाजी
चौक, परळी). सकाळी 10 वाजता पंढरी निवासस्थान परळी येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता
पंढरी निवासस्थान परळी येथून बीडकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता जय भगवान महासंघ आयोजित
श्री संत भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव-2016 बीड या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-डॉ.बाबासाहेब
आंबेडकर चौक, बीड). सोईनूसार बीड येथून पंढरी निवासस्थान परळीकडे प्रयाण व राखीव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा