गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

20 ऑगस्ट रोजी सदभावना दिवस आणि पंधरवडा साजरा होणार



बीड, दि. 18 :- दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने दि.20 ऑगस्ट 2016 हा दिवस सदभावना दिवस व दि.20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2016 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवाडा म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने सुचना दिलेल्या आहेत.
सदभावना दिवस व पंधरवाडा साजरा करण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे जिल्हा स्तरावर हा कार्यक्रम राबविण्यासाठी बीड तहसीलदार, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व (माध्यमिक) यांना कळविण्यात आले असून त्या अनुषंगाने या वर्षी सुध्दा संयुक्तपणे बीड मुख्यालयी दि.20 ऑगस्ट 2016 हा दिवस सदभावना दिवस व दि.20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2016 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवाडा साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा