मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

बाल न्याय मंडळ सदस्याच्या निवडीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव आवश्यक




          बीड, दि. 2 :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2000, महाराष्ट्र बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2002 व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) सुधारीत नियम 2011, बाल न्याय  (मुलांची काळजी व संरक्षण) 2015 या नूसार अंमलबजावणी महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात येत आहे. या अधिनियमांतर्गत सद्यस्थितीत कार्यान्वीत असलेल्या बाल न्याय मंडळ एक सदस्य पुरुष यांनी आपले पदाचा राजीनामा दिल्यामुळे एक पुरुष सदस्याची नियुक्ती करावयाची आहे. या बाल न्याय मंडळ सदस्यांची निवड करणेकरीता विविध सामाजिक कार्यकर्त्यांचे नामांकन प्रस्ताव आयुक्तालयास सादर करावयाचे आहे.
            सदर बाल न्याय मंडळ सदस्यांकरीता खालील कागदपत्रासह इच्छुकांनी नामांकन प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील. अर्जदाराची माहिती (बायोडाटा), मंडळाचे सदस्य यांना मानसशास्त्र व बाल कल्याण विशेष ज्ञान असावे, मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते यांनी मानसशास्त्र, गुन्हेगारीशास्त्र, समाजशास्त्र, समाजकार्य,अर्थशास्त्र, गृहविज्ञान शास्त्र, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, महिला विषयक अभ्यास, ग्रामविकास, मानवविकास इत्यादीपैकी समाजविज्ञानाच्या कोणत्याही एका विषयातील किंवा विधी किंवा औषधशास्त्र यातील पदवी धारण केलेली असावी. मंडळाचे सदस्य यांना बालकांशी संबंधित असलेला कायदा, आरोग्य, शिक्षण किंवा मुलांशी संबंधित इतर पुनर्वसन व विकास कार्याच्या क्षेत्रातील निदान तीन वर्षाचा अनुभव असावा. मंडळावर नामनिर्देशीत करावयाचे सदस्य, कोणत्याही फौजदारी अपराधात गोवलेले नसावेत आणि तो पुर्वी सिध्दापराध ठरविलेला नसावा. मंडळाच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा दत्तकविषयक सेवांच्या पदयोजनात कोणताही थेट संबंध नसावा ही बाब बालकांच्या कल्याणाच्या बाबतीत विपरीत असेल. मंडळाच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे वय त्याच्या नियुक्तीच्यावेळी 35 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा अधिक नसावे. मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते जास्तीत जास्त दोन वेळा नियुक्तीस पात्र असतील. मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते इतर कोणत्याही सेवेत सेवानियुक्त असतील तर त्यांच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच अर्जामध्ये खालील आवश्यक बाबींचा समावेश असावा. अर्जदाराची वैयक्तिक माहिती- नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, जन्मतारीख व वय, शैक्षणिक अर्हता,बालकल्याण क्षेत्रातील अनुभव. नौकरी/व्यवसायाबाबत तपशील कार्यालयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक. अर्जदार व्यक्तीचे बाल न्याय मंडळावर काम करण्यासाठीचे संमतीपत्र. विद्यमान सदस्यांची इतर कोणत्याही समितीवर नियुक्ती झालेली नसावी. बाल न्याय मंडळासाठी पुरेसा वेळ देवु शकणार असल्याचे संमतीपत्र. नजीकच्या जिल्ह्यातील बाल न्याय मंडळाचा प्रश्न उदभवल्यास त्या जिल्ह्याचा कारभार स्विकारणार असल्याचे हमीपत्र. पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
            बाल न्याय मंडळावर काम करण्यास इच्छुक व्यक्तींनी वर नमुद माहिती व स्वत:च्या आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वरद प्राईड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, धानोरा रोड, बीड या पत्यावर दि.8 ऑगस्ट 2016 पर्यंत 3 प्रतीत प्रस्ताव पाठवावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे आर.डी.कुलकर्णी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा