शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त
22 ऑगस्ट रोजी स्थानिक सुटी

          बीड, दि. 19 :-  सन 2016 या वर्षाकरीता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बीड जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त दि.22 ऑगस्ट 2016, रोजी स्थानिक सुट्टी राहिल. ही सुट्टी (राज्य न्यायालयाच्या अधिकारी कक्षेतील कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालय व बँकेच्या कक्षेतील कार्यालयाखेरीज) बीड जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकिय कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा