शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला बीड येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण


                       

          बीड, दि. 12 :- सोमवार दि.15 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 69 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सकाळी 9.05 वाजता ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकिय समारंभ आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, स्थानिक राजकीय पक्षाचे प्रमुख, दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा