शुक्रवार, ४ मार्च, २०२२

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारित योजनेसाठी 7 मार्च पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

                                                गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारित योजनेसाठी

7 मार्च पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन   

 

          बीड, दि. 4 (जि. मा. का.):- राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेसाठी बीड जिल्हृयातील 3 महसूली विभागातुन पात्र गोशाळांचे माजलगांव, अंबाजोगाई आणि पाटोदा या तीन महसूली विभागातुन अर्ज मागविण्यात आले असून योजनेचा उद्देश, लाभार्थी गोशाळा निवडीच्या अटी व शर्ती लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमून्यातील अर्ज आणि अनुषंगिक कागदपत्रे  www.ahd.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक पात्र गोशाळांनी  दि. 7 मार्च ते 6 एप्रिल 2022 या कालावधीत संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (व) पंचायत समिती यांच्याकडे 4 प्रतिमध्ये सादर करण्याचे, आवाहन जिल्हा पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. एच. पी. बोयाळे बीड यांनी केले आहे.

            उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालयात किंवा थेट पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात किंवा ई मेलवर सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. विहित कालावधी नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तरी विहित कालावधीमध्ये पात्र इच्छुक गोशाळांनी विहित नमून्यात अर्ज सादर करावेत.

                                                                                  ******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा