बीड, दि.23 :-जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी
यांच्यासाठी कॅशलेस पध्दतीने कोणकोणत्या प्रकारे व्यवहार केले जाऊ शकतात याबाबतचे प्रशिक्षण
जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, क्षेत्रीय कार्यालयाचे योगेश पोकळे यांनी मार्गदर्शन केले.
कॅशलेस पध्दत कशा प्रकारे सोयीची आहे व यामुळे आपला वेळ कशा प्रकारे वाचु शकतो याबाबतचे
सविस्तरपणे मार्गदर्शन संगणकीय सादरीकरणाद्वारे करण्यात आले. मोबाईल, इंटरनेट बँकिग,
वॉलेट इत्यादीद्वारे आपण कशा प्रकारे कॅशलेस पध्दतीने व्यवहार करु शकतो याबाबतची सविस्तर
माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणास जिल्हा कोषागार कार्यालयाचे कोषागार अधिकारी डी.डी.
माडे , अप्पर कोषागार अधिकारी लहू गळगुंडे, श्री.तोडकर व कोषागार कार्यालयातील कर्मचारी तसेच जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी व
त्यांचे प्रतिनिधी, सर्व उपकोषागार अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा