बीड, दि. 9 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती
पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे
आहे.
रविवार दि.11 डिसेंबर
2016 रोजी पुणे येथून हेलिकॉप्टरने स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालय
मैदान, अंबाजोगाई येथे हेलिपॅडवर दुपारी 12 वाजता आगमन. दुपारी 12.10 वाजता वाहनाने
पंचायत समिती, अंबाजोगाईकडे प्रयाण व पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपुजन
कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता हेलिकॉप्टरने मुदखेड जि.नांदेडकडे प्रयाण करतील.
सायंकाळी 5.45 वाजता परळी येथे आगमन व परळी निवासस्थानी मुक्काम.
सोमवार दि.12 डिसेंबर
2016 रोजी सकाळी 11.30 वाजता वाहनाने पांगरी ता.परळीकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता
पांगरी येथे आगमन व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 3 वाजता परळी निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वाजता वाहनाने पांगरी
ता.परळीकडे प्रयाण. पांगरी येथून सायंकाळी 5 वाजता हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे
प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा