बीड, दि.23 :- ग्लॅमरच्या दुनियेत
सहज काहीच मिळत नसते यासाठी संघर्ष करण्याची क्षमता, मेहनत आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या
जोरावर यश मिळवता येते, असे प्रतिपादन प्रसिध्द सिनेअभिनेत्री मानसी ऊर्फ कांची शिंदे
यांनी गेवराई येथील जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.
क्रीडा
व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, बीड
व आर. बी. अट्टल महाविद्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने र.भ. अट्टल महाविद्यालयातील गोदावरी सभागृहात दि.
22 डिसेंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाटन प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री
कांची शिंदे आणि सिनेकलावंत डॉ. सुधीर निकम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व पौर्णिमा
मनोर यांच्या स्वागत गीताने करण्यात आले.
मंचावर
सिनेकलावंत ॲड. प्रशांत जाधव, मेकअप आर्टिस्ट पवन साळवे, मिमिक्री आर्टिस्ट केशव बडे,
उपप्राचार्य प्रा. व्ही. पी. सांगळे, उपप्राचार्या डॉ. रजनीताई शिखरे, जिल्हा क्रीडा
अधिकारी नंदा खुरपुडे, क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सुहासिनी देशमुख, डॉ. प्रशांत
मुदकोंडवार, प्रा. दिनकर थोरात, राष्ट्रीय खेळाडु व कोरीओग्राफर श्रीमती मंजू वासनिक
आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांचे
स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सुहासिनी
देशमुख, डॉ. सचिन पगारे, रविंद्र खरात यांनी केले. प्रास्ताविकात श्रीमती नंदा खुरपुडे यांनी कार्यक्रमाचा
उद्देश स्पष्ट केला. उपस्थितांना मार्गदर्शन
करतांना डॉ. सुधीर निकम यांनी युवकांना कलावंत कसा घडतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र बरकसे यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी
अरविंद विद्यागर यांनी मानले. कार्यक्रमास
मोठ्या संख्येने युवक, युवती, सांस्कृतिक कार्यक्रम प्रेमी उपस्थित होते.
महोत्सवात
शास्त्रीय गायन, सितार, विना, तबला, बासरी, मृदंग, हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य,
वक्तृत्व, लोकगीत, लोकनृत्य व एकांकिका सादर झाल्या. महोत्सवासाठी परिक्षक म्हणून प्रा.
प्रमोद झेंडेकर, प्रा. अविनाश तौर, प्रा. संतोष नागरे, विलास सोनवणे, शिवाजी गायकवाड,
प्रा. दिपक जमदाडे, विष्णूप्रसाद खेत्रे, निशीकांत उदार, राधाकृष्ण वाघ, ऍ़ड. कमलाकर
देशमुख, ऍ़ड. सुभाष निकम यांनी काम केले. महोत्सवातून विभागीय युवा महोत्सवासाठी जिल्ह्याचा
निवडण्यात आलेला संघ मंगळवार दिनांक 27 डिसेंबर 2016 रोजी, विभागीय क्रीडा
संकुल, गारखेडा, औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय महोत्सवात सहभागी होईल. जिल्हास्तरीय
युवा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद लाभला. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले
आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा