बीड, दि. 19 :- क्रीडा व युवक सेवा
संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बीड, जिल्हा बेसबॉल असोसिएशन बीड मार्फत आयोजित राज्यस्तरीय
शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत मुलांच्या गटात औरंगाबाद तर मुलींमध्ये पुणे संघाने विजेतेपद
मिळवीले. नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय
शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आले आहेत.
बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर
तीन दिवस पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या
गटातील अंतीम सामण्यात औरंगाबादने नागपुरला 12-0 गुणांनी पराभूत केले. मुलींच्या गटात पुणे संघाने लातुरला 2-0 गुणांनी
पराभूत करुन विजेतेपद मिळवले. स्पर्धेचे बक्षीस
वितरण निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, परळीचे तहसिलदार विद्याचरण कडवकर,
राज्य बेसबॉल संघटनेचे कोषाध्यक्ष अशोक सरोदे, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे,
क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे (औरंगाबाद), सुहासिनी देशमुख, अरविंद विद्यागर, राजेंद्र
बनसोडे, दिपक रुपदे, अविनाश बारगजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले.
जिल्हा
क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी महाराष्ट्र संघाची घोषणा केली. यामध्ये 14 वर्षाखालील
मुलांच्या संघात गजानन पिंपळे, हर्षद सरोदे, कार्तिक फादट (औरंगाबाद)
आदित्य वीर (बीड), आशिर्वाद बिस्वाल (नागपुर), यश पांडे (नागपुर), रोहन बीराजदार (पुणे),
अजिंक्य चव्हाण (पुणे), भागवत पाटील (नाशिक), गुरुनाथ पायमल (कोल्हापुर), चैतन्य कट्टे
(कोल्हापुर), कोविद वानखेडे (अमरावती), ऍ़श्ले डिसुजा (मुंबई) महारुदध माळी (लातुर),
शाहु देशमुख (नाशिक), अनिकेत धोत्रे (लातुर) आणि राखीव खेळाडूमध्ये साहिल कंगाले, प्रथमेश रानवडे, अंकित शिंदे,
गिरीश माने, विजय खडसे यांचा समावेश आहे. तर 14 वर्षाखालील मुलींच्या संघात वैष्णवी सायकर, क्रांती निम्हन, वैष्णवी
फलके (सर्व पुणे), आकांक्षा कांबळे, सृष्टी कांबळे (लातुर), मेलीसा फर्नांडीस, अवेरी
पिंटो (मुंबई), निकीता रोकडे (औरंगाबाद), फरकुंदा जहीरोद्दीन मोहतसिब (बीड), पल्लवी
बदाले, प्रेरणा माने (कोल्हापुर), ऋतुजा केळकर, निधी देवरे (नाशिक), वैष्णवी पेशवे
(पुणे), अयाती सावंत (मुंबई), वैदेही पाटील (नाशिक) आणि राखीव खेळाडूमध्ये दिक्षा पडाळे, अंकीता करवडे, दिपाली पाटील, नंदिनी
पाटील, वरुंदा बेदालकर यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली येथे दि. 2 ते 8 जानेवारी 2017
दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी जाणाऱ्या महाराष्ट्र संघाचे शिबीर
बालेवाडी, पुणे येथे होणार आहे. स्पर्धा यशस्वी
करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर,
श्रीमती सुहासिनी देशमुख, अजय पवार, प्रा. दिनकर थोरात, दिपक रुपदे, अविनाश बारगजे,
ङि के. चंदवडे, छोटू गुंजाळ, के. जे. शेख, एस.एल. आंदुरे, विजय मुंडे, प्रा. राजेंद्र
बरकसे, भागवत घोडके, आरुण शेप, दादासाहेब बर्डे, गोरख कैवाडे, पंढरीनाथ क्षीरसागर,
श्रीनिवास सानप, रेवननाथ शेलार, किशोर काळे, मोनाली पुजारी, अजिज शेख, प्रेम झनझन,
रक्षांदा मोहोतसिब, मिलींद अंधारे, सचिन जाधव, रवि शिंदे, विष्णु मिसाळ, फय्युम शेख,
ताज पठाण, सोमनाथ राऊत, अशपाक पठाण, शेख रशिद, सुनिल ससाणे आदींनी प्रयत्न केले. असे
बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा