बीड,
दि.5 :- सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सण-उत्सवाच्या काळात व संभाव्य पुर
परिस्थिती लक्षात घेता अन्न-धान्यापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची
दक्षता घ्यावी. बीड तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नियतनानूसार, परिमानानूसार पात्र लाभार्थ्यांना
तसेच पुर परिस्थितीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाकडून माहे ऑक्टोबर 2016 चे धान्य
नियतन मंजूर होऊन स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप सुरु आहे. बीडचे तहसिलदार व पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार
यांनी माहे ऑक्टोबर 2016 चे धान्य उचल करण्याचे जाहीर केले आहे. असे तहसिलदार,बीड
यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा