बीड, दि. 16 :- दि.16
ऑगस्ट 2016 रोजी माजलगाव येथील सत्र न्यायाधीश एम.व्ही.मोराळे यांनी या प्रकरणातील
आरोपी नामे कृष्णा रामराव रिडडे व अच्युत उर्फ बप्पा उर्फ बाबु कचरु चुंचे दोघेही रा.चोरंबा
ता.धारुर जि.बीड यांनी मयत बालीकेच्या आईचा गळा दाबून खुन करुन नंतर मयत बालीकेवर आळीपाळीने
बलात्कार करुन तिचासुध्दा खुन केला. असा दुहेरी खुन केल्याप्रकरणी मा.न्यायालयाने आरोपींना दोष सिध्द केले आहे. ज्यामध्ये कलम
449, 354-ब, 376 (2)(आय), 302 सह कलम 34 भादंवी व कलम 4 बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक
कायद्याप्रमाणे दोषी सिध्द केले आहे.
त्यांना देण्यात येणाऱ्या
शिक्षेबध्दल आरोपीतांना मा.न्यायालयाने विचारले असता त्यांच्या वकीलांनी शिक्षेबाबत
सांगण्यासाठी एक दिवसाचा कालावधी मागून घेतल्याने आरोपीतांना शिक्षा देतांना त्यांचे
म्हणणे ऐकून घेण्यासाठी मा.न्यायालयाने आरोपीच्या
वकीलांना एक दिवसाची मुदत देवुन प्रकरण उद्या दि.17 ऑगस्ट 2016 रोजी न्याय निर्णय देण्याकामी
व आरोपींना शिक्षा ठरवणे कामी प्रकरण ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपींना काय शिक्षा
होते. याबाबत पूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या प्रकरणात निर्णय येणार या विचाराने
माजलगाव शहरातील अनेक पत्रकार व लोक मा. न्यायालयाचे इमारतीबाहेर उभे होते त्यामुळे
मा.न्यायालय पोलीस बंदोबस्त पाचारण करण्यात आला जेणेकरुन काही अनुचित प्रकार घडणार
नाही. या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले व ॲड.बी.एस.राख
व ॲड.आर.ए.वाघमारे यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी
गणेश गावडे यांनी केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा