बीड, दि. 8 :- नजिकच्या काळात होणाऱ्या नगर
परिषदांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात
उभारण्यात आलेल्या ' डमी ' मतदान केंद्राला भेट देवून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी
पाहणी केली व स्वत: प्रात्यक्षिकात सहभागी होऊन प्रायोगिक मतदाराची प्रक्रीया पार पाडली.
यावेळी त्यांनी संपूर्ण मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचेही निरीक्षण
करुन सविस्तर आढावा घेतला.
डिसेंबर 2016 मध्ये बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी वै,
माजलगाव, गेवराई व धारुर नगरपरिषदांच्या निवडणूका होणार असून नगराध्यक्ष थेट जनतेतून
निवडला जाणार आहे. बहूसदस्यीय प्रभाग पध्दतीनूसार बीडमध्ये 25 व माजलगांवमध्ये 12 प्रभाग
असून हे सर्व प्रभाग द्वीसदस्यीय तर अंबाजोगाईमध्ये 14 पैकी 13 प्रभाग द्वीसदस्यीय
राहणार असून चारही नगरपरिषदेत प्रत्येकी एक प्रभाग त्रिसदस्यीय असणार आहे. राज्य निवडणूक
आयोगाने प्रत्यक्ष मॉकपोल घेवून बहूसदस्यीय पध्दतीनूसार मतदान यंत्राच्या आवश्यतेबाबत
व मतदान केंद्रावरील मतदार संख्येबाबत अहवाल सादर करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यानूसार
तहसीलदार बीड व मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांना मॉकपोल आयोजित करण्याच्या सुचना दिल्या
त्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात 2 डमी मतदान केंद्रे तयार करुन त्यात द्वीसदस्यीय
व नगराध्यक्ष आणि त्रिसदस्यीय व नगराध्यक्ष मतदानासाठी मॉकपोल ठेवण्यात आले होते. यावेळी
मतदारांना प्रत्यक्ष मतदान करुन मॉकपोल घेण्यात आले. यावेळी तहसीलदार अशोक नांदलगावकर,
जिल्हा प्रशासन अधिकारी सतिश शिवणे, मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर, उपमुख्याधिकारी
साठे, कार्यकारी अभियंता बडे आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा