बीड, दि.4 :- सन 2016-17 या वर्षातील महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाअंतर्गत
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त जिल्हा क्रीडा
परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड यांचे मार्फत आयोजित होणाऱ्या जिल्हास्तर
शालेय व इतर क्रीडा स्पर्धांना जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेने सुरवात
झाली असून फुटबॉल स्पर्धा दि. 28 ते 29 जुलै 2016 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या
मैदानावर झाल्या.
या वर्षात मैदानी, खो-खो,
कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल,
क्रिकेट, योगा, बुध्दिबळ,
फुटबॉल आणि कराटे या दहा खेळाच्या शालेय
स्पर्धा तालुकास्तरा पासून होत असून इतर सर्व खेळांच्या स्पर्धा ह्या सरळ जिल्हास्तरापासून
पुढे होत आहेत. तालुकास्तर स्पर्धेचे आयोजन हे संबंधीत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी
तथा त्यांचे संयोजक यांच्यामार्फत होत असून जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन हे जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड मार्फत होत आहे. तालुकास्तर स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी संबंधीतांनी तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून तालुकास्तर
स्पर्धेचा कार्यक्रम प्राप्त करुन घेवून स्पर्धेत सहभाग घ्यावा व जिल्हास्तर स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे संपर्क साधून जिल्हास्तर
स्पर्धा कार्यक्रम प्राप्त करुन घेवून स्पर्धेत सहभाग घ्यावा. जिल्हास्तर व तालूकास्तर
स्पर्धेत सहभागी होण्याकरीता सर्व संबंधीत शाळा, विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये,
महाविद्यालये यांना गतवर्षीच्या नियमाप्रमाणे संलग्नता व खेळाडू / संघ प्रवेश फी दि.
10 ऑगस्ट 2016 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे जमा करणे आवश्यक आहे.
जिल्हास्तर शालेय व इतर क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे स्पर्धाचे आयोजन
होणार आहे.
जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त शाळा, विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालचे
यांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्राध्यापक, खेळाडू यांनी या
स्पर्धा कार्यक्रमाची दखल घेवून वेळेत स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, बीड यांनी कळविले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा