बीड, दि. 10 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या
वतीने इतर मागासवर्गीयातील लाभार्थ्यांना लहान
व मध्यम स्वरुपाच्या व्यवसायासाठी विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून
उद्दिष्टानूसार 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 6 टक्के इतक्या कमी व्याजदरात
कर्ज देण्यात येत असून या योजनेसाठी अर्ज सादर
करावेत.
या योजनेअंतर्गत व्यवसायानूसार कर्जाकरीता
बीज भांडवल उपलब्ध असून पारंपारीक उद्योग, कृषी संलग्न उद्योग, तांत्रिक व्यवसाय,वाहतूक
व्यवसाय व इतर लघु उद्योगांसाठी कर्ज दिले जाते. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1
लाख रुपयाच्या आत असून वय 18 ते 50 दरम्यान आहे अशा इतर मागासवर्गीय व्यक्तींनी या
योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घ्यावा. अर्ज दाखल
करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2016 आहे. असे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे
बीड जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा