बीड, दि. 9 :- स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या
वर्धापन दिनानिमित्त सोमवार 15 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी बीड येथील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामविकास,
महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण आयोजित करण्यात
आले आहे.
स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पूर्व तयारीचा
आढावा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत
घेण्यात आला त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित
होते. पोलीस,महसूल,क्रीडा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पुरवठा, आरोग्य, नगरविकास आदि
विभागांना या बैठकीत समारंभाच्या पूर्व तयारीबाबत सुचना देण्यात आल्या. समारंभाच्या
पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्याबाबत, कायदा व सुव्यवस्था अबाधित
राखण्याबाबत पोलीस विभागाला सुचना देण्यात आल्या.
15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय
समारंभ राज्यभर एकाचवेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा इतर कोणताही
शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.जर एखाद्या कार्यालयाला अथवा
संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8-35 वाजण्याच्या
पूर्वी किंवा 9-35 वाजताच्या नंतर आयोजित करावा अशा शासनाने सुचना दिल्या आहेत. याची
सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असेही निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी
सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा