शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ


          बीड, दि.4 :- शासनाने खरीप हंगाम 2016 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2016 अशी होती. केंद्र शासनाच्या दि.29 जुलै 2016 च्या परिपत्रकान्वये योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी मुदत वाढवून ती दि.2 ऑगस्ट 2016 अशी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषि व फलोत्पादन मंत्री पांडूरंग फुंडकर आणि राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या प्रयत्नामुळे व केंद्र शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढवून 10 ऑगस्ट 2016 अशी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याकरीता जवळच्या बँकेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे बीडचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा