शनिवार, ५ जानेवारी, २०१९



ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनवर 47 हजार
मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करुन पाहिले

     बीड दि.05 (जिमाका) :- जिल्हाभरात सध्या 22 टिममार्फत M-3 व्हर्जनच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनद्वारे जनजागृतीचा कार्यक्रम सुरु आहे. सदर कार्यक्रम दिनांक 20 डिसेंबर 2018 रोजी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 1042 ठिकाणी 47270 मतदारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनवर प्रत्यक्ष मतदान करुन पाहिले. जिल्हाभर सर्व 2311 मतदार केंद्रावर तसेच महाविद्यालय, सर्व शासकीय कार्यालय, आठवडी बाजार, प्रमुख चौक इत्यादी प्रमुख ठिकाणासह एकुण 3209 ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. डी. सिंह, भा.प्र.से. यांचे अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठी च्या निवडणूकीच्या तयारीच्या अनुषंगाने सर्व मतदान नोंदणी अधिकारी व सहायक मतदान नोंदणी अधिकारी यांची बैठक झाली.
           भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून युध्दपातळीवर तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री.  सिंह यांनी तालुकानिहाय निवडणूक विषयक बाबीचा आढावा घेतला.
          नविन प्रकारच्या व्हीव्हीपॅट मशिनवरील सांकेतीक उमेदवाराचे नावासमोरील निळे रंगाचे बटन दाबल्यांवर व्हीव्हीपॅट मशिनवरील काचेच्या पारदर्शी स्क्रिनखाली मतदारांने मत दिलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, उमेदवाराचे सांकेतीक नाव आणि उमेदवाराचे सांकेतीक चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनच्या काचेमधून मतदारास दिसते आणि स्वत: खात्री करुन घेता येते.
जिल्हाभरात ही जनजागृती मोहिम आणखी एक महिनाभर चालू राहणार असुन सदर कालावधीत उर्वरित सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी ही मोहिम राबविणे बाबत मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बीड यांनी सूचना दिल्या.
प्रशिक्षणास जिल्हयातील सर्व मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सर्व सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, निवडणूक नायब तहसिलदार, निवडणूक विषयक कर्मचारी इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
                                               *-*-*-*-*-*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा