शनिवार, ५ जानेवारी, २०१९





नगर-कडा रेल्वेमार्गावर 15 दिवसात रेल्वेचाचणी - पंकजा मुंढे
     बीड दि.0 5 (जिमाका) :- जिल्हयाच्या इतिहासात मोठी घटना ठरणारी नगर-परळी रेल्वे मार्गापैकी नगर-कडा मार्गावर 15 दिवसात रेल्वे चाचणी घेण्यात येणार असून जिल्हयाच्या व शहराच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी केले.
     परळी येथे राज्य शासनाच्या 5 कोटी रुपये विशेष रस्ता अनुदानातून शहरातील विविध ठिकाणी कामांचा शुभारंभ मंत्री श्रीमती पंकजा मुंढे यांच्या हस्ते झाला यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार डॉ. प्रितम मुंढे, माजलगावचे आमदार आर.टी. देशमुख, केजच्या आमदार श्रीमती संगीता ठोंबरे, आमदार सुरेश धस तसेच रमेश पोकळे, रमेश आडसकर, धम्मानंद मुंढे आदी उपस्थित होते.
मंत्री श्रीमती पंकजा मुंढे म्हणाल्या, गावांच्या विकासासाठी विविध कामे करण्यात येणार आहेत.जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी  35 कोटी रुपये दिले आहे त्यामधे बचतगटासाठी वास्तू उभारु असे त्यांनी सांगितले. परळी शहराच्या विकासासाठी 25 कोटी रुपये मुख्यमंत्र्याकडून मंजूर केले आहेत. त्याच बरोबर भव्य नंदीमुळी उभारुन  शहर सुशोभी करणासाठी प्रकल्प राबवू तसेच बीड जिल्हा परीषदेची  मोठी इमारत तयार होत आहे असे श्रीमती मुंढे म्हणाल्या.
खासदार डॉ. प्रितम मुंढे म्हणाल्या, राज्याच्या ग्रामविकास विभागाने 25:15 च्या माध्यमातून गावांमध्ये रस्ते निर्माण करताना जिल्हा परिषदेच्या शांळासाठी निधी दिला.
आमदार श्री. धस यांनी शहर व जिल्हयाच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा उल्लेख केला.आमदार श्री. देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक  योजना तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या  कामातून  शासनाने विकासाची कामे सुरु केली.आमदार श्रीमती ठोंबरे म्हणाल्या, जिल्हयासाठी मोठा निधी पालकमंत्री यांच्य माध्यमातून उपलब्ध होऊन रेल्वे, रस्ते, ग्रामविकासाची कामे केली आहेत.
मंत्री श्रीमती मुंढे यांच्या हस्ते लोकनेते दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी विविध संघटनांच्या वतीने  मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शहरातील  26 सिमेंट  रस्ते व नाली  बांधकामासाठी विकास कामे या विशेष अनुदानामधून  करण्यात येतील . या विकास प्रकल्पाशी संबंधित अभियंते श्री भांडे व श्री काकड यांचा सत्कार केला.

                                               *-*-*-*-*-*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा