शनिवार, ५ जानेवारी, २०१९









धारुरच्या विकासासाठी 24 कोटी रुपये
-- पालकमंत्री पंकजा मुंढे

              बीड,दि.05:- (जिमाका) लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण आरोग्य,पोषण यासाठी काम करतांना शासनाने शिक्षण,रहिवासी तसेच अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय, उज्वला गॅस  देण्यासाठी योजना राबविल्या आहेत.यातुनच धारुरच्या विकासासाठी 24 कोटी रुपये निधी दिला, असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंढे  यांनी केले.
              किल्ले धारुर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन श्रीमती मुंढे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी खासदार डॉ. प्रितम मुंढे,आमदार श्रीमती संगिता ठोंबरे,आमदार आर.टी. देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार,केशवदादा आंधळे,रमेश आडसकर,मोहनराव जगताप, सहाल चाऊस,उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार,नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी आदी उपस्थित होते.
        मंत्री श्रीमती मुंढे म्हणाल्या,जिल्हयाचा चेहरा मोहरा बदलताना एक विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी शासनाच्या विविध योजनातून मोठा निधी दिला. यामध्ये 25/15 योजनेतून 60 कोटी रुपये,शाळा दुरुस्तीसाठी 35 कोटी रुपये यासह ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी निधी दिल्याचा उल्लेख श्रीमती मुंढे यांनी केला.
            त्या म्हणाल्या,विद्यार्थी युवकांच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अभ्यसासिका उभारुन त्यामध्ये सोलर विद्युत  पुरवठा देऊन कायम स्वरुपी व्यवस्था निर्माण करणार आहे. महिलांच्या उन्नतीसाठी गावांमध्ये बचतगटासाठी वास्तु उभारणार आहे, असे मंत्री पंकजा मुंढे यांनी सांगितले.
            यावेळी दिनदयाळ अंत्योदय योजनेच्या लाभार्थी बचतगटांना निधीचे प्रमाणपत्रे देण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विविध सामाजिक संस्थांनी मंत्री महोदयांचा सत्कार केला. याप्रसंगी नवीन प्रशासकीय इमारतीची मंत्री श्रीमती मुंढे यांनी पाहणी केली. नगर परिषदेच्या इमारतीसाठी शासनाने 1 कोटी 70 लाख रुपये खर्च करुन तीन मजली सुसज्ज वास्तु उभी करण्यात आली.   
                                                                           *******
                            
वृत्त क्र. 18


                              उच्च व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

          बीड,दि.5:- (जिमाका) पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी या परीक्षा  17 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्या होत्या. 17 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 रोजी घेण्यात येणार असल्याने या परिक्षा  24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
                                                        *******



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा