बुधवार, १९ डिसेंबर, २०१८


अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांचे
प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार
                                                 --निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी
            बीड, दि.19:- शासन अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित असून  शासनाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विद्यार्थी व नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून अल्पसंख्याक  समाजातील गरजू लाभार्थींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यासह नागरिकांनी पुढाकार घेण्याची  गरज आहे, असे सुतोवाच निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.
            मंगळवार दि. 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पसंख्याक  हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  बोलत होते. या कार्यक्रमास नगर परिषदेचे मुख्याधिकारी, धनंजय जावळीकर,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी उस्मानी नजमा सुलताना,अल्पसंख्याक समितीचे पदाधिकारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे बोलतांना निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, समाजातील प्रत्येक नागरिकांना कायदयाने मुलभूत अधिकार प्राप्त करुन दिले असून त्यांनी त्याचा वापर करण्याची गरज आहे.  असे सांगून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे यासाठी शासनाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोई सुविधा   उपलब्ध करुन दिल्या आहेत त्याचाही लाभ त्यांनी घेतला पाहिजे. असेही  निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
            अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधून विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यार्थीनीच्या निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे बक्षिस वितरण निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सुर्यवंशी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
            निबंध स्पर्धेत गट 5वी ते 8 वीचे विद्यार्थी प्रथम क्रमांक उसैद अलीयाखान जावेद खान मिल्लीया बॉईज हायस्कुल,बीड व्दितीय क्रमांक शेख सानिया युनूस जि.प.उच्च प्राथमिक शाळा गावदरा.ता. धारुर,तृत्तीय क्रंमाक सासे धनश्री रमेशराव विमला माध्यमिक विद्यालय,गेवराई, गट 9 वी ते 10 प्रथम क्रमांक उजैर मलिक सुफवाज असिफ,मिल्लीया बाँईज हायस्कुल,बीड, व्दितीय क्रमांक काबरा लक्ष्मी कैलास, विमला माध्यमिक विद्यालय,गेवराई,तृतीय क्रंमाक कदम गणेश बालासाहेब,नाथकृपा माध्यमिक विद्यालय कासारी ता. धारुर जि. बीड. उतेजनार्थ बक्षीस मोमीन गौरमान अब्दुल करीम,मिल्लीया गर्ल्स हायस्कुल बीड,इग्रजी माध्यम बीड, शेख मदीहा तहेरीन आसेफ उद्रु माध्यम,बेग आसमा खालेद, जिल्हा परिषद शाळा,नवा मोढां माजलगाव,मराठी माध्यम. श्रेया ध्नजय काळे, पठाण् आयेशा आरेफ,मिलीया कन्या शाळा बीड, ऋतुजा पडीतराव मोटे,विमला विद्यालय,गेवराई,काळे श्रेया धनंजय,सरस्वत माध्यमिक विद्यालय,धारुर. पठाण् अजमल अमजद, गट 9 ते 10 वीची विद्यार्थीनी श्रद्रधा विक्रम करांडे,विमला विद्यालय,गेवराई, शेख अबुजर रफिक,इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल,गेवराई, गणेश बाळासोहब कदम,नाथकृपा मायामिक विद्यालय,कासारी, खेत्रे रविराज सीताराम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबारुई
            कार्यक्रमाचे प्रस्ताविक यावेळी जिल्हा परिषदेच्या उपशिणाधिकारी श्रीमती उस्मानी नजमा सुलताना यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी मा. श्री सोनवणे यांनी केले.   या कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी यांच्यासह अल्पसंख्यांक समाजातील पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.
-*-*-*-*-





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा