शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८






पालकमंत्री पंकजा मुंढे
यांनी घेतला विविध विभागाच्या प्रलंबित कामाचा आढावा
            बीड, दि. 28 :- राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास तथा पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी परळी येथील चेमरी विश्राम गृहामध्ये आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शिक्षणविभाग, रुरबण योजना, सार्वजनिक बाधकांम विभाग आणि गृह या पाच विभागाची बैठक घेऊन प्रलंबित कामे मार्च अखेर पूर्ण करुन बीड जिल्हयाचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकावे अशा सूचना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
            या बैठकीस जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा कृषी अधिकारी श्री. चपळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  धनराज निला, कार्यकारी अभियंता श्री. सानप हे उपस्थित होते.
            यावेळी पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी राष्ट्रीय आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य केंद्राचे करण्यात येणारे बांधकाम पुर्ण करुन इमारतीचे उद्याटन करण्यास सज्ज ठेवावे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, मोतीबिंदू मुक्त जिल्हा, कायाकल्प योजना, मातृवंदन योजना, सुरक्षित मातृत्व अभियान, गोवर रुबेला लसिकरण, महावितरण विभागाने  दीनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत किती कुंटुबांना याचा लाभ दिला, सबस्टेशन ची किती कामे केली, ग्रामीण व शहरी भागाची उपकेंद्राची पूर्ण झालेली व अपुर्ण कामे याची माहिती घेतली.
            शासनामार्फत राबविण्यात येणारे शामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशनतर्फ साचलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करुन गावे स्वच्छ करावीत तसेच शाळा व्यवस्थापन, शाळा कायापालट, शाळांच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असल्यास रंगरंगोटी करुन शाळेतील भिंतीवर सुविचार लिहून शाळा आकर्षक कशा दिसतील या दृष्टीने नियोजन करुन 26 जानेवारी 2018 पर्येंत कमीत कमी  100 शाळा उद्याटनासाठी तयार ठेवाव्यात. राष्ट्रीय व राज्य महामार्गांची कामे उत्तम दर्जाची व वेळेत पूर्ण करुन घ्यावीत.
            जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अभाधित राहण्यासाठी व शांततेच्या दृष्टीने  कोण कोणत्या उपाययोजना केल्या गेल्यात. विविध गुन्हयातील गुन्हेगांराची संख्या, महिला अत्याचांराची संख्या, त्यांच्या सुरक्षतेसाठी काय काळजी घेतल्या जाते, गुन्हेगारीला व महिलावरील अत्याचाराला किती प्रमाणात आळा बसला ही सर्व माहिती  श्रीमती पंकजा मुंढे यांनी सखोल व प्रात्याक्षिका द्वारे जाणून घेतली  व जिल्हयाच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करुन कोणत्याच विभागाला निधी कमी पडू दिल्या जाणार नाही. अधिकाऱ्यांनी योग्य अंमलबजावनी करुन कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे असेही पालकमंत्री यांनी  याबैठकी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
            जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू नये यासाठी जिथे पाणीसाठा उपलब्ध असेल तेथून  टंचाई असलेल्या ग्रामीण भागासाठी  पाण्याचा पुरवठा करावा.  जनावरांना चारा कमी पडू देऊ नये, चाऱ्यांची टंचाई अधिक भासत असेल तर जनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात, याकामात कुचराई करु नये अशा सूचना  पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंढे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
            याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी पाच विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांचा आढावा पालकमंत्री यांच्यासमोर सादर करुन पाणी व चारा टंचाई यावर शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून दुष्काळी परिस्थितीत पाणी व चारा टंचाई भासू दिली जाणार नाही असे सांगितले.
            याबैठकीस विविध विभागाचे संबधित अधिकारी ,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
*-*-*-*-*-*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा