शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८


कुष्ठरोग हा शाप नाही
        कुष्ठरोग म्हटले की, आपल्या डोळयासमोर एखाद्या मंदिरासमोर,बसस्टॅण्डवर,रेल्वेस्टेशनवर हातापायानां चिंध्या बांधलेला विकृत माणूस आपल्या नजरे समोर तरळतो व नकळत आपल्या मनात तुच्छतेची भावना प्रगट होते. कुष्ठरोग झालेला माणूस कुंटंबातुन व समाजातुन बहिष्कृत केल्या जातो. या रोगापेक्षा बहिष्कुत जीवन जगण्याचे दुख: त्याला जास्त छळते.दुस-याच्या दयेवर जगण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्यायच उरत नाही.काही कुंटुंबात कुष्ठरोग हा शाप समजल्या जातो तर काही त्या व्यक्तीला  कर्माची फळे म्हणून घरातुन हाकलुन देतात. यातुनच माणूस मग अंधश्रध्देकडे वळतो. पण कुष्ठरोग हा शाप किंवा कर्माचे फळही नसून त्याची लक्षणे दिसताच त्यावर उपचार केला तर तो निश्चितपणे बरा होऊ शकतो.कुष्टरोग्यांनी नियमित उपचार घ्यावे व आपले मानसिक संतुलन बिघडू देऊ नये.कुष्ठरोगाची लक्ष्णे दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी. मोफत उपचाराबरोबरच जुन्या कुष्ठरुग्णासाठी,त्यांना जगण्याच बळ मिळावे,समाजाच्या दयेवर जीवन न जगता स्वत:ला उदरनिर्वाह करण्याचे साधन मिळावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी काही योजनाही काढल्या आहेत.
                                                                                                                 बेबीसरोज अंबिलवादे,
                                                                                                               जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                                                                          बीड


            कुष्ठारोगाचे रुग्ण लवकर बरे व्हावेत व त्यांनाही सामान्य व्यक्ती प्रमाणे जीवन जगता यावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी मोफत उपचार पध्दती सुरु केली असून जुन्या विकृती आलेल्या कुष्ठरोग्याच्यां पुनर्वसनासाठी शासनाकडून विविध प्रकारची मदत केली जाते. तळपायाला पूर्ण बधीरता आलेल्या विकृत कुष्ठ रुग्णाने मागणी केल्यास एम.सी.आर. चप्पल वर्षातुन दोन वेळेस वाटप करण्यात येते.डोळयास बाधा झालेल्या विकृत कुष्ठ रुग्णास गॉगल देण्यात येतो.ज्या कुष्ठ रुग्णाची हातापायाची बोटे किंवा डोळयाना लॅगाप्थालमस्ची बाधा झाली असल्याने व शस्त्रक्रीय करण्यास रुग्ण पात्र असेल तर अशा सर्व रुगणास बीड जिल्हया जवळ असलेल्या वडाळा जि. अहमदनगर ,मिरज,जिल्हा सांगली येथे पाठविण्यात येते. या काळात त्यांचा रोजगार बुडतो म्हणून शस्त्रक्रिया करुन घेणा-या रुगणास शासनाच्या नियमानुसार भत्ता देण्यात येतो. कुष्ठ रुग्णास स्वत:ला किंवा त्याच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीस स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नाशिक येथे आयटीआय मध्ये मोफत  कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते.ज्या जुन्या कुष्ठ रुग्णांचे कुष्ठ बरे होऊ शकत नाही ते उदरनिर्वाहासाठी काही काम करु शकत नाही त्यांना  आर्थिक पुनर्वसनासाठी शासनाकडून अंत्योदय अन्न योजना,संजय गांधी निराधार पेन्शन योजना, इंदिरा गांधी आवास योजनांचा लाभ दिल्या जातो.
            कुष्टरोग हा त्वचाचा आजार नसून तो नसांचा आजार आहे. माईक्रोबॅक्टेरियम लेप्रा नावाचा बॅक्टरिया नसामध्ये गेल्यामुळे कुष्ठरोग होतो.या जंतुमूळे नसा हळु हळु निकामी होऊन त्यावरील मास झडु लागते. कुष्ठरोगी रुगणामध्ये विकृती यायला लागते. कुष्ठरोग हा रोग्याच्या संपर्कात आल्याने होत नाही.रोग्याच्या शिंकण्यातुन आणि खोकल्यातुन हे जंतु दुस-या व्यक्तीच्या शरीरात जातात. ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल त्याला कुष्ठरोगाची बाधा खूप लवकर होते.           

            कुष्ठरोग होण्याची कारणे,आजाराची लक्षणे व त्यावर  शासनाचे मोफत उपचार ठेवले असून ते  पुढीलप्रमाणे आहे.कुष्ठरोग हा मायकोबॅक्टरियम लेप्री नावाच्या कुष्ठजंतु जिवाणूमुळे होतो. या कुष्ठ जंतुचा शोध डॉ. एच.ए.हॅनसन यांनी सन 1873 मध्ये लावला आहे. कुष्ठ रोगाची लक्षणे:- लाल पांढरट थोडासा तेलकट चट्टा येतो, कानाच्या पाळया जाडसर गाठी आल्यासारख्या जाड होतात,त्या ठिकाणी त्वचेवर केस राहत नाहीत.चटटयावर घाम येत नाही.हातापायानां मुंग्या येतात. हातापायाच्या जखमा दुरुस्त होत नाहीत.मज्जातंतु जाडसर होतात, दुखतात. त्वाचा व मज्जातंतु या अवयवानां  बाधा पोहचते.कुष्ठरोग हा दोन प्रकारचा असतो सांसर्गिक कुष्ठरोगामध्ये पाच एमबीपेक्षा जास्त बधीर चट्टे व एक मज्जातंतु एक किंवा एक पेक्षा जास्त असतात. असांसर्गिक कुष्ठरोगामध्ये पाच एमबीपेक्षा कमी बधीर चट्टे असतात.
            कुष्ठरोग पसरण्याची कारणे:- औषधोपचार न घेणारा सांसर्गिक रुग्ण त्याच्या खोकलन्यातुन जंतु हवेत पसरतात,त्याच्या श्वासोश्वासातुन हे जंतु निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. रोगप्रतिकार शक्ती अत्यंत कमी असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसतात. कुष्ठरोगाची लक्षणे दिसण्यासाठी जंतुचा अशयघन काळ किमान तीन वर्षाचा व कमाल 30 वर्षापर्यत असतो. रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असलेल्या कोणत्याही स्त्री,पुरुष,बालक,नोकरदार,व्यवसायिक,बेरोजगार अशा कोणत्याही व्यक्तीस कुष्ठजंतुचा संसर्ग होऊ शकतो. कुष्ठरोगी व्यक्तीचे निदान सर्व सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर यांच्याकडून तपासणी नंतर व प्रयोगशाळेत त्वचेची तपासणी केल्यानंतर कुष्ठरोगावर पुढीलप्रमाणे उपचार होऊ शकतात.
            रुग्णाच्या कुष्ठाच्या प्रकारानुसार रुग्णास 6 महिने किंवा 12 महिने नियमित उपचार घ्यावे लागतात. यात 28 दिवसाची एक स्ट्रीप असते. औषधाची मात्रा दिवसातुन एकच वेळ घ्यावी लागते. रुग्णांना घरी कुंटुंबात राहून औषध घेता येते. औषधाचा एक डोस घेतल्यानंतर शरीरातील 90 टक्के कुष्ठ जिवाणू मरतात व अशा रुगणांकडून कोणालाही  सोबत राहणा-या व्यक्तीलाही संसर्ग होत नाही उपचार नियमितपणे घेतले तर रुग्ण पूर्ण बरा झाल्यावर सर्वसामान्य जीवन जगू शकतो.
            पहिल्या प्रकारात पीबी असांसर्गिक रुग्णांस 6 महिने नियमित उपचार घ्यावा लागतो. पहिल्या दिवशी 2 अरसीन व 1 डॅप्सोन व नंतर मात्र 28 दिवसापर्यंत रोज 1 डॅप्सोन दुसरा प्रकार एमबी सांसर्गिक रुग्णांस 12 महिने नियमित उपचार घ्यावा लागतो.पहिल्या दिवशी 2 आरसीन 1 डॅपसोन 3 क्लोफॅझीमीन नंतर 28 दिवसापर्यंत रोज 1 डॅप्सोन 1 क्लोफॅझीमन असा उपचार रुग्णास घ्यावा लागतो.
            कुष्ठरोग्याच्या उपचारासाठी कोणताही खर्च लागत नसून सर्व शासकीय दवाखाने,प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा सामान्य रुगणालय,शासकीय वैद्यकीय माहाविद्यालय,नगरपालीका आणि महानगरपालीका येथे  रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.
            जुन्या औषधोपचार पूर्ण केलेल्या व विकृतीग्रस्त रुग्णाना सेवा आणि सल्ला पाहिजे असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयबीड,वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई,उपजिल्हा रुगणालय,परळी या ठीकाणी कुष्ठ रुग्णांना हात,पाय,डोळयाची काळजी कशी घ्यावी याबाबत सल्ला व आरोग्य शिक्षण देण्यात येते. त्यांसाठी त्यांनी वरील ठिकाणी संपर्क साधावा.
            कुष्ठरोगाची जनजागृती करण्यासाठी व त्यानां कुष्ठ रुग्णाना औषधोपचाराबरोबच मानसिक बळ मिळावे म्हणून शासनातर्फे 26 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग होऊ नये त्यासाठी व झाल्यानंतर काय उपाय करावेत यासाठी जिल्हाधिकाकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन स्पर्श अभियानातंर्गत बीड येथे रॅलीची आयोजन करुन फलकाव्दारे विविध म्हणी घोषवाक्य, बसस्टॅण्ड,मंदिरे,इत्यादी गर्दीच्या  ठिकाणी हस्त पत्रिका वाटण्यात आल्या. विविध शाळेमधून प्रश्नमंजुषा,ग्रामसभा,पथनाटय स्क्रीप्ट तयार करण्यात आली.  तसेच कुष्ठरोगाविषयीची कुष्ठरोग तज्ज्ञामार्फत माहिती देण्यात आली. बीड जिल्हयामध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण दर 10,000 लोकसंख्येमध्ये 0.5 एवढे असून सध्या जिल्हयात डिसेंबर 2017 अखेर 154 कुष्ठरुग्णांवर औषधोपचार चालु आहे नवीन कुष्ठ रुग्ण 6.40 असून या वर्षात माहे डिसेंबर 2017 अखेर 129 नवीन कुष्ठ रुग्णांना शोधण्यात आले आहे. बीड जिल्हयात आतापर्यंत उपचार पूर्ण केलेले जुने आणि नवीन विकृती ग्रेड 1 व 2 चे एकून 955 कुष्ठरुग्ण असून त्यांच्यावर उपचार चालु आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा