बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

गौण खनिज यंत्र सामुग्री व साधन सामुग्रीवर
शास्तीची तरतुद निश्चित करण्यात आली
बीड,दि,7:- महाराष्ट्र शासनाने दि. 12 तानेवारी 2018 रोजी राजपत्रव्दारे जमीन महसूल(गौण खनिजाचे उत्खनन व ती काढणे) नियम 1968 मध्ये सुधारणा करुन नवीन नियम 9 हा समाविष्ठ करुन त्याव्दारे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48 (8) अन्वये गौण खनिज काढण्यासाठी,हलविण्यासाठी,गोळा करण्यासाठी व दुस-या जागी नेण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीवर त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहतुक साधने याच्यांवर पुढीलप्रमाणे शास्तीची तरतुद करण्यात आली आहे.
वाहने,साधनाचा प्रकार,शास्तीची रक्कम ड्रील मशीन 25,000/- रुपये, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॅाली, हॉप बॉडी ट्रक, सक्शन पंप 1,00,000/- रुपये, फुल बॉडी ट्रक, डंपर, ट्रालर,क्रप्रेसर 2,00,000, ट्रालर बार्ज, मोटोराज्ड बोट 5,00,000/- रुपये आणि एकस्कॅवेटर, मॅकनाईज्ड लोडर 7,50,000 रुपये याप्रमाणे शास्तीची रक्कम आहे.
महाराष्ट्र जमिन अधिनियम 1966 चे कलम 48 (7) अन्वये गौण खनिजाच्या बाजारमुल्याच्या पाचपट रकमेच्या व्यतिरिक्त राहील. जप्त केलेल्या यंत्रसामुग्री व वाहतुकीची साधने यांच्या बाजारमुल्यापेक्षा अधिक नसेल इतथ्या रकमेच्या वैयक्तीक जातमुचलका घेण्यात येईल. यामध्ये जातमुचलक्याचा निष्पादक किंवा कुंटुंबातील सदस्यांच्या अचल संपती जसे जमीन,घर यांचे विवरण सादर करुन त्यासंबधीची सांक्षाकित कागदपत्रे किंवा जिल्हयाधिका-यांच्या नावाने ताबे गहान ठेवलेल्या प्रतीभुती किंवा राष्ट्रीयकृत बँकेची बँक हमी सादर करावी लागेल.
वैयक्तीक जातमुचलका निष्पादकाने जप्त केलेली यंत्रसामुग्री, साधन सामुग्री व वाहतुकीची साधने अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन वाहतुक किंवा विल्हेवाटीसाठी वापर नाही अशी हमी देणे बंधंनकारक केले असून
सबब अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक  करणा-याला गौणखनिजाच्या बाजारमुल्याच्या पाचपट दंडा व्यतिरिक्त जप्त वाहनांची शासती रक्कम व वैयक्तीक जातमुचलका अशी तिहेरी कार्यवाहीला समोरे जावे लागणार असल्यामुळे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियत्रंण व प्रतिबंधाकरिता अशा प्रकारची कार्यवाही महसूल उपविभाग बीड कार्यक्षेत्रात यापुढे करण्यात येणार असल्याची माहिती बीडचे उपविभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.*********


जिल्हा व सत्र न्यायालयात
शासकीय वाहनाचा जाहिर लिलाव
            बीड,दि,7:- जिल्हा व सत्र न्यायालय बीड अंतर्गत पुढील निर्लेखित शासकीय वाहनांचा जाहिर लिलाव दि.16 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथील प्रांगणात होणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी या संधीचा फायदा घ्यावा. लिलाव करण्यात येणा-यावाहनाचा तपशील,निर्मिती वर्ष व संख्या पुढीलप्रमाणे आहे.
            मारुती इस्टीम पेट्रोल कार क्रमांक एम.एच.01.बी.ए.1314 निर्मिती वर्ष 2001, संख्या एक हे वाहन कार्यालयीन वेळेत जिल्हा न्यायालयाच्या परिसरात निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. लिलावाच्या अटी व शर्तीसाठी सहाय्यक अधिक्षक,लेखा व वित्त विभाग,जिल्हा सत्र न्यायलय,बीड यांच्याकडे संपर्क साधावा अशा सूचना बीड जिल्हा न्यायालयांचे प्रबंधक यांनी केल्या आहे.*******




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा