शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८


जलयुक्त शिवार व शेततळयाची कामे
ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावेत
                                            --जिल्हाधिकारी एम.डी. सिंह
         बीड, दि.23:- जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच  मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्द्टि दिलेली कामे मुदतीत पूर्ण  करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना   दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान व मागेल त्याला शेततळे योजनेची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपजिल्हाधिरी महेंद्र कुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी एम.डी सिंह यांनी जलयुक्त शिवार अभियान व मागेल त्याला शेततळे योजनेच्या कामाचा यंत्रनेकडून सविस्तर माहिती घेवून चालु वर्षात यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट वेळेत पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.  शेततळयासाठी  ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या  जिल्हयातील शेतकऱ्यांना शेततळयाचे काम करण्याचे मंजूरी आदेश दिले पाहिजेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेततळयाचा लाभ दिला पाहिजे असे सांगून जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे या योजनेची  कामे  मार्च अखेरपर्यंत एकही प्रलंबित राहणार नाहीत याची यंत्रणांनी  दक्षता घ्यावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सन 2015-16 पासून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तीन टप्यात 722 गावांची निवड करण्यात आली असून टप्पा क्र. 1 अंतर्गत निवड केलेल्या 271 गावांमधील कामे पूर्ण झालेली आहेत. टप्पा क्र. 2 मध्ये सन 2016-17 मध्ये जिल्हयातील 256 गावांची निवड करण्यात आली असून गावातील कामांचा कालावधी 2018 मार्च अखेर समाप्त होणार आहे. यामध्ये विविध यंत्रणाची एकूण 5073 कामे प्रस्तावित करण्यात आली असून जानेवारी 2018 अखेर 3443 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याकामामध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर, माती नाला बांध, पाझर तलाव, गांव तलाव, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुर्नरुजीवन, शेततळी, जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश असून उर्वरित कामे मार्च- 2018 अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे नियोजन व कालबध्द कार्यक्रमाबाबत तालुकानिहाय व क्षेत्रीय कर्मचारी निहाय जिल्हाधिकरी एम.डी. सिंह यांनी सविस्तर  आढावा घेवून  प्रलंबित  कामे मार्च 2018 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी  अमलबजावणी यंत्रणांना केल्या.
            यावेळी जिल्हाधिकारी एम. डी सिंह यांनी टपा क्र. 3 मध्ये सन 2017-18 साठी जिल्हयातील एकूण 195 गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांची एकूण 3385 कामे आराखडयात प्रस्तावित करण्यात आली आहेत. एकूण आराखडा 139.81 कोठी रुपयाचा आहे. टप्पा क्र. तीन मध्ये बांधबंदिस्ती ,खोल समतल चर इत्यादी क्षेत्र उपचाराची कामे 89265 या क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. तसेच माती नाला बांध,अर्दन स्ट्रक्चर,सिंमेट नाला बांध,पाझर तलाव,गाव तलाव,कोल्हापुरी बंधारा,सिंचन तलाव दूरुस्ती,सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती,पुर्नरुजीवन शेततळी,वनविभागामार्फत वनतळी, गुरे प्रतिबंधक चर जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावे कामांची सविस्तर अंदाजपत्रके तयार करुन त्यास प्रशासकी मान्यता घेवुन निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
            यावेळी तसेच मागेल त्याला शेततळे कार्यक्रमातंर्गत जिल्हयात 6 हजा 500 शेततळे उभारण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे.  एकूण 12हजार 312 शेतक-यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले असून 7 हजार 903 शेतक-यांना कामे करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. दि. 15 फेब्रुवारी 2018 अखेर एकून 3 हजार 754 शेततळयाची कामे पूर्ण झाली असून 526 कामे प्रगती पथावर असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ  यांनी यावेळी दिली. या आढावा बैठकीस जिल्हा व तालुकास्तरीय समितीचे सदस्य, यंत्रणेचे अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.
*******


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा