जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हा एकात्मीक आरोग्य
व कुटुंब कल्याण नियामक समितीची बैठक संपन्न
बीड, दि. 1:- जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटुंब
कल्याण सोसायटीच्या नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याबैठकीत मुख्य कार्यकारी
अधिकारी श्री येडगे यांनी राष्ट्रीय कुटुंब
कल्याण कार्यक्रम, माताबाल संगोपन कार्यक्रम,असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग
विारण कार्यक्रम, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम तसेच किटकजन्य रोग
नियंत्रण कार्यक्रम इत्यादी बाबींचा संस्थानिहाय आढावा घेतला. तसेच जिल्हयातील आरोग्य
विषयक कामाचाही संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील
उपलब्ध निधी मार्च अखपर्यंत खर्च झाला पाहिजे अशा सुचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना
दिल्या.
यावेळी दि.11 मार्च,2018 रोजी होणाऱ्या पल्स
पोलीओ लसीकरण मोहिम व नियमित लसीकरण सर्वेक्षणा विषयी माहिती जाणून घेवून हे लसीकरणाचे काम यशस्वीपणे पुर्ण करावे.
जिल्हयातील आरोग्य संस्थांतील सर्व कामामध्ये गुणात्मक सुधारणा करावे. तसेच नजीकच्या काळात साथीचे रोग उदभवू नये यासाठी
संस्थानिहाय कृतीआराखडा तयार करण्याच्या सुचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री येडगे
यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक
थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
संजय पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहयसंपर्क)डॉ. सतीष हारीदास, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. संजय कदम
यांच्यासह जिल्हयातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,
संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा