बीड, दि. 23 :- मयत इनामदार काझी रियाजोद्दीन पिता काझी मजबोद्दीन
अर्जदार काझी मोहम्मद काझी पि.रियाजोद्दीन रा.धोंडराई ता.गेवराई जि.बीड यांची फाईल क्र.2007/इनाम/कावि-317 अन्वये
सर्व जनता मौ.धोंडराई ता.गेवराई जि.बीड यांना जाहिरनामाद्वारे कळविण्यात येत असून मज्जीत
काझीगीरी मौ.धोंडराई ता.गेवराई जि.बीड इनामदार काझी रियाजोद्दीन पिता काझी मजबोद्दीन
हे दि.04/10/2017 रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या नावे स.नं.ग.नं. 141/3, 87/3,
63/1, 167, 168/2 येथे इनामी जमीन आहे.
मयताचे वारस काझी मोहम्मद काझी पि.रियाजोद्दीन
वय 70 वर्ष (मुलगा), काझी अदिल पि.रियाजोद्दीन वय 60 (मुलगा), काझी अमिल पि.रियाजोद्दीन
वय 58 (मुलगा), काझी रब्बानी बेगम सरकारोद्दीन वय 80 (मुलगी), काझी सरवरी बेगम सर फरोद्दीन
वय 55 (मुलगी), शेख अपवरी बेगम अजरोद्दीन वय
50(मुलगी) यांनी उपविभागीय कार्यालय, बीड येथे दि.19 ऑक्टोबर 2007 रोजी अर्ज दाखल करुन
मयताची विरासत अर्जदारांच्या नावे होण्याकरीता रुजु झाले आहेत. दिलेल्या अर्जान्वये
उपरोक्त विरासत कार्यवाही करीता जाहिरनामा प्रसिध्दीसाठी दिलेला आहे. जर कोणास काही
आक्षेप किंवा हितसंबंध असल्यास जाहिरनामा प्रसिध्दीपासून 30 दिवसाच्या आत लेखी पुराव्यासह
स्वत: किंवा विधीज्ञमार्फत बीड उपविभागीय कार्यालयात उपस्थित रहावे. मुदत संपल्यानंतर
आलेल्या आक्षेप अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि प्राप्त झालेल्या कागदपत्राआधारे
अर्जदाराच्या नावे विरासत मंजूर करण्यात येईल. असे बीडचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा