मंगळवार, २३ मे, २०१७

तक्रार निवारणासाठी पोलीस दलाचा जनसंपर्क कार्यक्रम


          बीड, दि. 23 :- पोलीस ठाणे येथे येणारे सर्व जनतेच्या तक्रार निवारणाकरीता व त्यांच्याशी संपर्क साधून अडचणी समजावून घेण्याकरीता दि.27 मे 2017 पासून प्रत्येक शनिवारी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे येथे उपस्थित राहून जनसंपर्क साधणार आहेत.

          या जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत प्रलंबित तक्रारी अर्ज प्रत्यक्ष तक्रारदाराशी समक्ष निवारण करतील. स्थानिक नागरिकांना पोलीस ठाणे येथे आमंत्रित करुन त्याच्या येणाऱ्या अडचणी समजून घेतील व उपाययोजना तयार करतील. पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी हे कोणत्या पोलीस ठाण्यास भेट देणार आहेत याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे स्थानिक पातळीवर नागरिक, पत्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुपवर दर गुरुवारी व शुक्रवारी प्रसारीत करतील. कार्यक्रमात प्रलंबित तक्रारी कोणत्या आहेत याबाबत खुलासा असेल तसेच नागरिकांच्या बैठकीची योजना असेल. तक्रार निवारण बैठक जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इत्यादीबाबत शक्य होत नसेल तर त्याबाबत गुरुवारी व शुक्रवारी स्थानिक नागरिकांना पत्रव्यवहाराने कळविण्यात येईल. असे बीडचे पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा