बीड, दि. 18 :- सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात
औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या इयत्ता पहिली व दुसरीसाठीच्या
प्रवेशास इच्छुक मुला-मुलींनी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेतील प्रवेशासाठी
अर्ज करावेत.
अर्जदाराने अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या
दाखल्याची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत
छायांकित प्रत व दारिद्रयरेषेचा अनुक्रमांक नमुद करावा. पालकाची उत्पनन मर्यादा 1 लाख
असून सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असावे. अर्जासोबत पालकांनी संमतीपत्र देणे आवश्यक
आहे. विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकीय अधिकारी यांचे
प्रमाणपत्र जोडावे. या योजनेत अदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा घटस्फोटीत,
निराधार, व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील पाल्याना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध
असून भरलेले अर्ज दि.31 मे 2017 पर्यंत जमा करावेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर
होणारा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार असून पालकांनी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, ओरियन्स टॉवर, आझाद चौकाजवळ औरंगाबाद येथे अधिक माहितीसाठी
संपर्क साधावा. असे औरंगाबादचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी
यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा