बीड, दि. 18 :-पंचायत समिती, जिल्हा परिषद,
नगर परिषदा, नगर पंचायत तसेच सामान्य रुग्णालयांच्या स्तरावर अपंग व्यक्ती हक्क अधिनियम
2016 बाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने बीड जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण
अधिकारी कार्यालयामार्फत शनिवार दि.20 मे 2017 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
अपंग व्यक्ती हक्क अधिनियम सन 2016 हा नव्याने कायदा
अंमलात आला असून हा कायदा तयार करतांना युनायटेड नेशन कन्वेंशन फॉर पर्सन विथ डिसॲबीलिटी
या जाहिरनाम्यातील तरतूदी तसेच देशातील तज्ञ व्यक्ती, अपंग कल्याणार्थ कार्य करणाऱ्या
स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी, विविध थेरपिष्ट,तंत्रज्ञान व कायद्यातील तज्ञ व्यक्ती
यांचा समावेश करण्यात आला होता. या कायद्यातील तरतूदी नवीन व अपंग व्यक्तींच्या हक्काबाबतीत
असल्याने यास राज्यभर व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देणे अत्यंत आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील
सर्व शासकीय कार्यालयाचे कार्यालय प्रमुख, सर्व शिक्षा अभियानअंतर्गत काम करणारे साधन
व्यक्ती, अपंग शाळाचे मुख्याध्यापक, कर्मचारी व संस्थाचालक तसेच अपंगासाठी कार्य करणाऱ्या
सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे. कार्यशाळेस मुंबई
उच्च न्यायालयातील विधीतज्ञ उदय वारुंजीकर मार्गदर्शन करणार आहेत. असे बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी
यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा