बीड
तहसील कार्यालयात
ई-पॉस
मशीनचे वितरण व प्रशिक्षण
बीड दि. 30 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पीडीएस द्वारा अन्न-धान्य
वितरणासाठी बीड तालुक्यासाठी शासनाकडून ई-पॉस मशीन प्राप्त झाल्या असून बीड
तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना या मशीन तात्काळ वितरीत करण्यात येणार
आहेत. ई-पॉस मशीन वितरण व
प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवार दि.1 जून 2017 रोजी सकाळी 11 वाजता मिटींग हॉलमध्ये
आयोजित करण्यात आला असून दुकानदारांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानाच्या डाटा
एन्ट्री दुरुस्ती यादीसह हजर रहावे. या बैठकीस गैरहजर राहिल्यास माहे जून 2017 चे
मासीक धान्य नियतन मिळणार नाही याची नोंद घ्यावी. असे बीडचे तहसीलदार यांनी कळविले
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा