बीड, दि. 31 :- अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या हस्ते
अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी
राजेंद्र वाघ, नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही
अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी
कार्यालय, कोषागार कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय तसेच इतर विभागांचे अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा